Good News : मान्सूनने देश व्यापलाIndia China Faceoff: मोदीजी, चीनला खूश करण्यासाठी ‘ते’ धोकादायक विधान केलंत का?; काँग्रेसचा सवालहृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रियासलमान खानशी या अभिनेत्रीने घेतला पंगा, म्हणाली – ‘बॉलिवूड तुझी वैयक्तिक संपत्ती नाही’CoronaVirus: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले?, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रCoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीवCoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाहीशिक्षक शाळेत येणार; तर विद्यार्थी घरीच राहणार
ऑनलाईन क्लासच्या तणावातून आठवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या – INM24
Connect with us

ऑनलाईन क्लासच्या तणावातून आठवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

राज्य

ऑनलाईन क्लासच्या तणावातून आठवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

राजकोट – गुजरातमधील राजकोट येथे आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन क्लास आणि होमवर्कच्या तणावातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या मुलीच्या वडिलांचे गॅरेज असून त्यांनी तिला ऑनलाईन अभ्यासासाठी १० हजार रुपयांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलीच्या आईने तिला अभ्यास करण्यासाठी सांगितल्यानंतर तिने आंघोळ करण्याचं कारण सांगून खोलीत गेली आणि गळफास लावून घेतला.

अहमदाबाद मिररने दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय विद्यार्थिनी ऑनलाईन क्लास, दिला जाणारा होमवर्क याला वैतागलेली होती. तसेच शाळेतील मित्र – मैत्रिणींना भेटता येत नसल्याने भावनिक तणाव देखील असल्याचे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.बराच वेळ उलटला तरी मुलगी खोलीबाहेर आली नाही. म्हणून तिची आई खोलीत गेली. त्यावेळी तेथे मुलगी लटकलेल्या स्थितीत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत मुलीचा लहान भाऊ आणि ती गुजराती माध्यमात शिकत होते. लॉकडाऊनमुळे मुलीला आठवीच्या वर्गात प्रमोट करण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन क्लास विद्यार्थ्यांना आवश्यक असल्याने मुलीच्या वडिलांनी १० हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या पालकांकडे विजेचे बिल भरायला देखील पैसे नाहीत. त्यांच्या कुटुंबात पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करण्यात आला होता. घरात सर्वात स्वस्त मोबाईल वापरला जात आहे. 

More in राज्य

Advertisement
Advertisement
To Top