Good News : मान्सूनने देश व्यापलाIndia China Faceoff: मोदीजी, चीनला खूश करण्यासाठी ‘ते’ धोकादायक विधान केलंत का?; काँग्रेसचा सवालहृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रियासलमान खानशी या अभिनेत्रीने घेतला पंगा, म्हणाली – ‘बॉलिवूड तुझी वैयक्तिक संपत्ती नाही’CoronaVirus: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले?, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रCoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीवCoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाहीशिक्षक शाळेत येणार; तर विद्यार्थी घरीच राहणार
१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाही – INM24
Connect with us

१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाही

राज्य

१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : लगतच्या पढेगाव, चिकणी, जामणी, नीमगावसह लगतच्या गावखेड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकºयांनी सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची पेरणी केली. पावसाच्या ओलाव्यामुळे कपाशीचे बियाणे अंकुरले. काही प्रमाणात सोयाबीनचेही बियाणे अंकुरले. पण, काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती अल्प असल्याने पढेगाव येथील सुमारे १०० एकरावर पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट ओढावले आहे.
शेतकरी गजानन सुभाष घायवाट, धनराज साटोणे, गजानन मेंढुले, बाबाराव सातपुते, लिलाधर रेवतकर, निरंजन घायवाट, आंबोडा येथील सुधाकर लोखंडे आदींसह पढेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले काही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटता सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी याची माहिती संबंधित कृषी केंद्र चालकांमार्फत कंपनीला दिली असता काही कंपनीच्या अधिकाºयांनी शेताच्या बांधापर्यंत येऊन पिकांची पाहणी केली.
पण, कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल की, नाही, या चिंतेत शेतकरी असून बियाणे कंपन्यांप्रती रोष निर्माण झाला आहे.

सोयाबीन पिकाची उगवण अल्प प्रमाणात झाल्यामुळे संबंधीत कृषिकेंद्र मालकाकडे तक्रार केली असता त्यांनी सिद्ध सीड्स प्रॉडक्ट कंपनीकडे पाठपुरावा केला. कंपनीचे तीन अधिकाऱ्यांनी शेतात येत पाहणी केली. सोयाबीन बियाण्यांचा लॉट नं. तपासून पुढील प्रक्रियेसाठी पाठविले. आणि दोन दिवसात याबाबत माहिती देतो, असे म्हणून शेतातून काढता पाय घेतला.

More in राज्य

Advertisement
Advertisement
To Top