Good News : मान्सूनने देश व्यापलाIndia China Faceoff: मोदीजी, चीनला खूश करण्यासाठी ‘ते’ धोकादायक विधान केलंत का?; काँग्रेसचा सवालहृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रियासलमान खानशी या अभिनेत्रीने घेतला पंगा, म्हणाली – ‘बॉलिवूड तुझी वैयक्तिक संपत्ती नाही’CoronaVirus: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले?, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रCoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीवCoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाहीशिक्षक शाळेत येणार; तर विद्यार्थी घरीच राहणार
Good News : मान्सूनने देश व्यापला – INM24
Connect with us

Good News : मान्सूनने देश व्यापला

देश

Good News : मान्सूनने देश व्यापला

मुंबई : नैऋत्य मान्सूनने आज, २६ जून २०२० रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. १२ दिवस आधी मान्सूननने देश व्यापला आहे. सर्वसाधारण रित्या ८ जुलै रोजी मान्सून देश व्यापतो. यावर्षी मान्सून वेगाने दाखल झाला. आणि त्याने निर्धारित वेळेपेक्षा आधी देश व्यापला आहे. ११ जून रोजी मान्सून मध्य अरबी समुद्र, संपुर्ण गोवा, कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, संपुर्ण रायलसीमा, आंध्रप्रदेशचा किनारी भाग, तेलंगणाचा काही भाग, छत्तीसगडचा दक्षिण भाग, दक्षिण ओरिसा, बंगालच्या उपसागराचा उत्तर व पश्चिम मध्य भाग, नागालँडचा उर्वरित भाग, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशचा काही भाग, आसाम आणि मेघालयाच्या आणखी काही भागात दाखल झाला होता. १४ जून रोजी मान्सूनने मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली होती. मान्सून मध्य अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग, मुंबई, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल झाला होता.

मान्सून केरळमध्ये सर्वसाधारण तारखेला म्हणजे १ जून रोजी दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली होती. यंदा मान्सून शेतीसाठी पूरक आहे. मान्सूनसाठी हानीकारक असलेला अल निनो यंदा न्युट्रल आहे. ला निना मान्सूनला अनुकूल ठरतो. मान्सूनच्या मध्यात ला निनो तयार होईल. हे सुद्धा सुचिन्ह आहे. हे सर्व घटक असे दर्शवित आहेत की एकंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येणार आहे. देशात मान्सूनला एक वेगळे महत्त्व आहे. देशाची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. कारण मान्सून चांगला झाला तर शेती चांगली होते. आणि शेती चांगली झाली तर खाद्यनिर्मिती चांगली होते. परिणामी सर्वांचेच डोळे मान्सूनकडे लागलेले असतात. देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम १ जूनपासून सुरु होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो.

गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे आगमन, त्याचा वर्षाव, परतीचा प्रवास यात बदल होत आहेत. हे बदल होत असल्याने मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती.  १९०१ ते १९४० दरम्यान देशातील १४९ ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. हवामान खात्याने १९६१ ते २०१९ दरम्यान ५८ वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. तर १९७१ ते २०१९ दरम्यानच्या ४८ वर्षांच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर  त्याचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल केले. मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जूनच आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही. परतीच्या पावसाची तारीख १५ ऑक्टोबरच ठेवण्यात आली आहे. म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी मान्सून संपुर्ण देशातून माघार घेईल.

————————

मान्सून केरळमध्ये केव्हा दाखल झाला
वर्ष        महिना
२०१५    ५ जून
२०१६    ८ जून
२०१७   ३० मे
२०१८   २९ मे
२०१९   ८ जून

More in देश

Advertisement
Advertisement
To Top